पाच हजार ५२९ कोरोनाबाधित, तर ६ हजार ५३० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:41+5:302021-04-22T04:11:41+5:30
पुणे : शहरात रविवारपासून सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून येत असल्याची दिलासादायक बाब ...
पुणे : शहरात रविवारपासून सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून येत असल्याची दिलासादायक बाब आहे. बुधवारी दिवसभरात ५ हजार ५२९ कोरोनाबाधित आढळून आले आहे. ६ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ बुधवारी दिवसभरात २४ हजार ४०९ जणांनी कोरोना तपासणी केली आहे. तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २२.६५ टक्के इतकी आहे़
दरम्यान, आज दिवसभरात ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६४ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार २३५ कोरोनाबाधित रुग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३१४ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १९ लाख ४६ हजार २३७ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ३ लाख ८२ हजार ४९१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख २४ हजार २९७ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५१ हजार ९२० इतकी झाली आहे़