नीरा आठवडे बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:29 AM2020-12-04T04:29:00+5:302020-12-04T04:29:00+5:30
नीरा : नीरा आठवडे बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिस व प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहिम उघडली होती. त्यामध्ये सुमारे ---- इतक्या ...
नीरा : नीरा आठवडे बाजारात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिस व प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहिम उघडली होती. त्यामध्ये सुमारे ---- इतक्या जणांवर प्रत्येकी --- रुपये या प्रमाणे तब्बल पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मागील आठवड्यात नीरा (ता. पुरंदर) येथील आठवडे बाजारत होणारी गर्दी, बाजारकरू व व्यावसायिक विनामास्क बाजारत दिसल्याने कोरोनाच्या द्रुष्टीने ही धोक्याची घंटा ओळखुन दै. लोकमतने ''''सावधान... कोरोन वाढतोय आठवडे बाजारातील गर्दी : विनामास्क बेफिकीरपणा नडणार'''' या शिर्षकाखाली व्रुत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जेजूरी व नीरा पोलीसांनी आज बुधवार दि.२ रोजी नीरा आठवडे बाजारात पथतका द्वारे बाजारात जे दुकानदार, भाजीविक्रेते, फळविक्रेते विना मास्क विक्री करत होते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
नीरा येथील आठवडे बाजारात लोक बेफिकरीने बाजर करतात तसेच बाजारकरू व व्यावसायिक ही विना मास्क वावरता त्यामुळे जेजूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, नीरा दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास गोतपगारे, राजेंद्र भापकर, विशाल रासकर, धर्मराज खांडे, प्रविण शिंदे, निलेश जाधव, नंदा यादव, भुषण कदम, रामचंद्र कर्णवर यांसह होमगार्ड यांनी धडक मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली.
छत्रपती शिवाजी चौक, अहिल्याबाई होळकर चौक व बारामती रोडवरील व्यावसायिकांना दवंडी देत कोरोना अजुन गेला नाही स्वत: काळजी घ्या व ग्राहकांना विना मास्क वस्तू विक्री करु नका, सर्वांनी मास्क वापरा, सोशल डिस्टंसीग ठेवा, दुकानात गर्दी करु नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे आव्हाम नीरेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास गोतपगारे यांनी केले.
--
कोट
नीरा पोलीस दुरक्षेत्र हे जेजूरी पोलीस स्टेशनपासूनचे अंतर बरेच आहे. लोकांना आपल्या न्याय हक्काच्या समस्या जेजूरी येथे येऊन मांडाव्या लागतात. यामध्ये गोरगरीबांचा वेळ व आर्थिक तोटा होत असतो. त्यासाठी दर बुधवारी मी नीरा पोलीस दुरक्षेत्रात येऊन लोकांच्या समस्या तसेच नीरेची वाहतूक कोंडी व कायदा सुरक्षेच्या द्रुष्टीने आढाव घेणार आहे. नीरा पोलीस दुरक्षेत्रा अंकीत येणाऱ्या गावातील लोकांनी दर बुधवारी आपल्या कायदे विषयक समस्या नीरा पोलीस दुरक्षेत्राच मांडाव्यात.
-सुनिल महाडिक,
पोलीस निरिक्षक, जेजूरी पोलीस स्टेशन
--