पाच वर्षांत आरबीएसके कडून पाच हजार माेफत शस्त्रक्रिया

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 22, 2023 07:09 PM2023-10-22T19:09:10+5:302023-10-22T19:09:46+5:30

ह्रदयशस्त्रक्रियांपासून हाडांच्या शस्त्रक्रिया, हायड्राेसाईल, हर्निया, ॲपेंडिक्स, पाईल्स, फाटलेली टाळू, तिरळेपणा, दातांच्या शस्त्रक्रिया असे वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश

Five thousand free surgeries from RBSK in five years | पाच वर्षांत आरबीएसके कडून पाच हजार माेफत शस्त्रक्रिया

पाच वर्षांत आरबीएसके कडून पाच हजार माेफत शस्त्रक्रिया

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) द्वारे शुन्य ते १८ वयाेगटातील ५ हजार ५६२ बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ह्रदयशस्त्रक्रियांपासून हाडांच्या शस्त्रक्रिया, हायड्राेसाईल, हर्निया, ॲपेंडिक्स, पाईल्स, फाटलेली टाळू, तिरळेपणा, दातांच्या शस्त्रक्रिया असे वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

आरबीएसके कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. पुणे जिल्हाअंतर्गत एकुण ७३ आरोग्य तपासणी पथके आहेत. प्रत्येक पथकामध्ये १ पुरुष वैद्यकिय अधिकारी, १ स्त्री वैद्यकिय अधिकारी, १ औषध निर्माता आणि १ परिचारीका यांचा समावेश असतो. अंगणवाडी स्तरावरील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते आणि शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एक वेळा करण्यात येते.

तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजारी बालके/ मुलांना योग्य ते उपचार देण्यात येतात व त्यांचा पाठपुरवठा करण्यात येतो. तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या लाभार्थी मधील जन्मत: व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरते आभावी होणारे आजार, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब व आजार या बाबीचे वेळेवर निदान करून अशा मुलांना पुढील योग्य ते उपचार देण्यासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भीत करण्यात येते. शिवाय अशा संदर्भित केलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करुन मुलांच्या शस्त्रक्रियेचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो.

सन २०१९ पासुन राज्यस्तरावरुन विविध रुग्णालयाशी सांमजस्य करार झाल्यापैकी ते १८ वयोगटातील बालक किंवा मुल यांचे एकूण ३७ जणांच्या कानाच्या क्वाक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रिया आरबीएसके कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधी मधुन झालेल्या आहेत. या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी ५ लाख २० हजार इतका खर्च आलेला आहे.

तर, सन २०१८ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत एकुण १७०२ हदयशस्त्रक्रिया या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आहेत. या शस्त्रक्रिया माेरया हॉस्पीटल चिंचवड, कोकिळाबेन हॉस्पीटल मुंबई, इंदोरवाला मेमोरियल हाॅस्पीटल नाशिक व ज्युपिटर हॉस्पीटल बाणेर, फोर्टिस हॉस्पीटल मुंबई येथे करण्यात आलेल्या आहेत.

तसेच सन २०१८ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत एकुण ५ हजार ५६२ इतर शस्त्रक्रिया या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व पुण्यातील इतर नामांकित रुग्णालयात करण्यात आल्या आहेत, अशी माहीती या कार्यक्रमाचे व्यवस्थापक आशिष पुरणाळे यांनी दिली.

Web Title: Five thousand free surgeries from RBSK in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.