जवानांसाठी पाच हजार राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:45 AM2018-08-24T04:45:44+5:302018-08-24T04:46:11+5:30
शिवसेना हडपसर महिला आघाडीच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाच हजार राखी पाठवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हडपसर : सीमेवरील सैनिक आपल्या सर्वांचे शत्रूपासून रक्षण करत आहेत. सैनिकांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र आपण सुरक्षित आहोत ते फक्त सैनिकांमुळेच. त्यामुळे शिवसेना हडपसर महिला आघाडीने पाच हजार सैनिकांना राख्या पाठवण्याचा हा स्तुत्य उपक्रम केला आहे, असे माजी आमदार महादेव बाबर यांनी मत व्यक्त केले.
शिवसेना हडपसर महिला आघाडीच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाच हजार राखी पाठवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबर बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना हडपसर विधानसभा महिला समन्वयक नीता भोसले यांनी केले होते. या वेळी नगरसेविका संगीता ठोसर, माजी नगरसेवक विजय देशमुख, पुणे शहर समन्वयक अमोल हरपळे, के. टी. आरू, समीर तुपे, टेंभुर्णी शहरप्रमुख सुरेश लोंढे, वैष्णवी घुले, विद्या होडे, वत्सला घुले, सुप्रिया डाळिंबाकर, सुशीला भोसले, सुनंदा देशमुख, सलमा पाटकर, अनिता जांभूळकर, धनश्री बोराडे, कविता मंडलिक, आविष्कार सोसायटीचे चेअरमन शरद नवले तसेच पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी लक्ष्मण घुले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. टी. आरू यांनी केले.
हडपसर परिसरातील महिलांनी एकत्र येऊन पाच हजार राख्या गोळा केल्या आहेत. या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठ्वण्याकरिता महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.