पाच हजार रुग्ण बरे अन् दोन हजार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:03+5:302021-05-10T04:12:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सलग नवव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून रविवारी दिवसभरात २ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सलग नवव्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून रविवारी दिवसभरात २ हजार ०२५ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ४ हजार ८२५ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १,४०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या दोन हजारांनी घटली असून हा आकडा ३३ हजार ७३२ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १,४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार २६२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ३५८ झाली आहे. पुण्याबाहेरील २४ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ४ हजार ८२५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५ हजार ४७४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ४६ हजार ५६४ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ७३२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १३ हजार १०७ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २२ लाख ७६ हजार ८८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.