पाच वर्षांत पुण्यातल्या ४९७ मुलांना मिळाले आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:22+5:302021-02-26T04:14:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या काळात जग ठप्प झाले असताना ‘बालक दत्तक’ योजनाही अडखळली. अपत्य नसलेल्या दांपत्यांना मातृत्व, ...

In five years, 497 children in Pune got parents | पाच वर्षांत पुण्यातल्या ४९७ मुलांना मिळाले आई-बाबा

पाच वर्षांत पुण्यातल्या ४९७ मुलांना मिळाले आई-बाबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या काळात जग ठप्प झाले असताना ‘बालक दत्तक’ योजनाही अडखळली. अपत्य नसलेल्या दांपत्यांना मातृत्व, पितृत्व प्रदान करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पार पाडण्यात आली. एकात्मिक बालसंरक्षण योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षात आतापर्यंत ६४ मुलांची दत्तक प्रक्रिया पार पडली आहे. गेल्या पाच वर्षांत ४९७ बालकांना दत्तक घेण्यात आले आहे.

अपत्य नसलेल्या पालकांसाठी केंद्र शासनातर्फे ‘बालक दत्तक’ योजना सुरु करण्यात आली. बालक दत्तक योजनेअंतर्गत ० ते ६ वयोगटातील मुलांची दत्तक प्रक्रिया पार पडते. काही पालकांना ६ वर्षांवरील मूल दत्तक घ्यायचे असल्याच त्या पध्दतीची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. बालगृहांमधील मुलांना या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेतले जाते. महिला आणि बालविकास कार्यालयाअंतर्गत पुण्यात ७ दत्तक संस्था कार्यरत आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त मनीषा बिरारीस यांनी दिली.

--------------------

पुणे जिल्ह्याची आकडेवारी

वर्ष देशांतर्गत दत्तक मुलेदेशाबाहेर दत्तक मुले

२०१६-१७ १४७ २५

२०१७-१८ १०५ ४१

२०१८-१९ ९६ ४१

२०१९-२० ८५ ०५

२०२०-२१ ६४ १९

------------------------------------------------

एकूण ४९७ १३१

--------------------

राज्याची आकडेवारी :

वर्ष देशांतर्गत दत्तक मुलेदेशाबाहेर दत्तक मुले

२०१६-१७ ७०२ १४५

२०१७-१८ ६४१ १६६

२०१८-१९ ६७६ १५४

२०१९-२० ५३८ ६९

२०२०-२१ ४३७ ७५

------------------------------------------------

एकूण २९९४ ६०९

चौकट

मुली दत्तक घेण्यास प्राधान्य

दर वर्षी मुलांच्या तुलनेत मुलगी दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. दत्तक प्रक्रिया अर्जात दांपत्यांना मुलगा, मुलगी आणि काहीही असे तीन पर्याय दिलेले असतात. काहीही हा पर्याय निवडला तरी शक्यतो मुलींना दत्तक देण्याचे प्रमाण मोठे आहे.

चौकट

दत्तक प्रक्रिया

दत्तक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘कारा’ संस्थेकडे ऑनलाईन अर्ज केला जातो. पालकांची चौकशी झाल्यानंतर बालकल्याण समितीकडून मान्यता दिली जाते. बालकाशी भेट झाल्यानंतर एका महिन्याच्या आत पालकांना आपला निर्णय कळवायचा असतो. पालकांना तीन बालकांना भेटण्याची परवानगी असते. तिन्ही बालके नाकारल्यास त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत सर्वात शेवटी जाते. दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पालकांचे समुपदेशनही केले जाते. प्र्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो आणि त्यानंतर न्यायालयाद्वारे अंतिम आदेश दिला जातो.

चौकट

पालक ‘वेटिंग’वर

सध्या राज्यातील २९९८ पालक ‘वेटिंग’वर आहेत. त्यापैकी अनेकांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाकाळात संथ झालेली ही प्रक्रिया हळूहळू पूर्ववत होत आहे. प्रतीक्षा यादीतील दांपत्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, चौकशी, समुपदेशन ही प्रक्रिया पार पडून त्यांना लवकरात लवकर मूल घेऊन जाता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दत्तक प्रक्रिया पार पाडताना केवळ आर्थिक क्षमताच नव्हे तर पालकत्व निभावण्याची मनापासूनची इच्छा, मनोवस्था यावरही लक्ष केंद्रित केले जाते.

Web Title: In five years, 497 children in Pune got parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.