चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:14+5:302021-09-08T04:16:14+5:30

पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये राहात असलेल्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलवण्यास तिच्या घरी गेलेल्या अकरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ...

Five years hard labor for molesting Chimukali | चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी

चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी

Next

पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये राहात असलेल्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलवण्यास तिच्या घरी गेलेल्या अकरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. लखन पेरियार असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षाचा कारावास भोगावा लागेल. तसेच, दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. २६ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.३० च्या सुमारास धानोरी परिसरात हा प्रकार घडला.

याबाबत पीडितेच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेच्या दिवशी पीडिता सोसायटीच्या पार्किंगमध्ये मित्रांसमवेत खेळत होती. यावेळी ती सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीला खेळायला बोलावण्यासाठी तिच्या घरात गेली. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या वॉचमनच्या नातेवाईकाने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करीत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकारी पक्षातर्फे अरूंधती ब्रम्हे यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी ५ साक्षीदार तपासले. गुन्ह्यात पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सतीश जाधव यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Five years hard labor for molesting Chimukali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.