चीनी मांजा सापडल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:33+5:302021-01-14T04:10:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. ...

Five years in prison if found | चीनी मांजा सापडल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास

चीनी मांजा सापडल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणाऱ्या या चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी डॉ. गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावासाठी ‘हेल्पलाईन’ सुरु करण्याचीही मागणी त्यांनी केली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. पुणे, नागपूर, नाशिकसह अन्य शहरात मांजाने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे.”

“या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या १८ वर्षांपासून काम करीत आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून या संदर्भात माझ्याशी संपर्क साधावा,” असे डॉ. गंगवाल म्हणाले.

Web Title: Five years in prison if found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.