सणसवाडीत दरोड्याच्या तयारीतील पाच युवक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:32+5:302021-08-17T04:16:32+5:30
-- कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या पाच युवकांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा, जिवंत ...
--
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथे दरोड्याच्या तयारीत थांबलेल्या पाच युवकांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच दोन दुचाक्यांसह काही साहित्य जप्त करून जेरबंद केले असून, मन्या ऊर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे, संतोष श्रीमंत लांडे, महादेव हरिश्चंद्र शिंदे, सिद्धार्थ राजू कांबळे, अमोल रमेश गोटे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील प्रतीक्षा बियर शॉपीसमोरील मोकळ्या जागेत १४ ऑगस्ट रोजी काही संशयित तरुण दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शिक्रापूर पोलीस पथक त्या ठिकाणी पोचले. पोलिसांची चाहूल लागताच तेथील युवक सैरावैरा पळायला लागले. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने साऱ्यांनाच पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, लोखंडी कटावणी, लोखंडी स्क्रूड्रायवर, पाच मोबाईल, दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत, दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी मन्या ऊर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे (वय २१), श्रीमंत लांडे (वय २३), महादेव हरिश्चंद्र शिंदे (वय २१), सिद्धार्थ राजू कांबळे वय (२६ वर्षे), अमोल रमेश गोटे (वय २६, सर्व रा. सणसवाडी ता. शिरुर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक सागर कोंढाळकर हे करत आहे.
ही कामगिरी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महेंद्र पाटील, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, पोलीस शिपाई जयदीप देवकर, निखिल रावडे, किशोर शिवणकर, राहुल वाघमोडे, लक्ष्मण शिरसकर आदींनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता काही युवक संशयितपणे त्या ठिकाणी दिसून आले.
--
चौकट
यापूर्वी चौघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल
शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या मन्या ऊर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे, संतोष श्रीमंत लांडे, महादेव हरिश्चंद्र शिंदे, सिद्धार्थ राजू कांबळे या आरोपींवर यापूर्वी शिक्रापूर, लोणी कंद, हडपसर, चंदननगर व पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल असून, यापैकी मन्या ऊर्फ अर्जुन भंडारे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीदेखील शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
--