तक्रारवाडीवर सर्वपक्षीय पॅनेलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:08+5:302021-01-20T04:12:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सताधारी पक्षाला धूळ चारत सर्वपक्षीय पॅनलने ७ जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी ...

The flag of the all-party panel on the complaint | तक्रारवाडीवर सर्वपक्षीय पॅनेलचा झेंडा

तक्रारवाडीवर सर्वपक्षीय पॅनेलचा झेंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सताधारी पक्षाला धूळ चारत सर्वपक्षीय पॅनलने ७ जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी पॅनलला २ जागांवरच समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकतील विजय हा गोरगरीब जनतेचा विजय असल्याचे मत या वेळी माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी मांडले.

इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तक्रारवाडी गावात सत्ताधारी पार्टीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. नेत्यावर प्रेम तर गावातील राजकीय पुढाऱ्याच्या कारवायांनी त्रस्त झालेला पाटील यांचा एक गटसुद्धा या सत्ताधारी पक्षाविरोधात मैदानात उतरला होता. तीन प्रभागांत लढविण्यात आलेल्या निवडणुकीत पहिल्या प्रभागात सर्वपक्षीय तीनही उमेदवार निवडून आले. तर दुसऱ्या प्रभागात ३ पैकी ३ उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग तीनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या २ आणि सर्वपक्षीय पक्षाची १ जागा विजयी झाली. प्रभाग १ मध्ये सतीश विनायक वाघ, मंदाकिनी मोरे, राणी काळंगे हे सताधारी पार्टीचे राजेंद्र सीताराम वाघ, ज्योती काळंगे, पुष्पा गणेश गजरे यांचा पराभव करीत विजयी झाले. तर प्रभाग २ मध्ये अविनाश धुमाळ, प्राजक्ता वाघ, मनीषा वाघ हे सताधारी पार्टीचे विलास गडकर, अश्विनी वाघ, रोहिणी वाघ यांचा पराभव करीत निवडून आले. तर ३ प्रभाग मध्ये सताधारी पार्टीच्या २ आणि सर्वपक्षीय १ असे एकूण ९ पैकी ७ जागांवर सर्वपक्षीय पक्षांनी विजय मिळवीत ग्रामपंचायतीवर आपला झेंडा रोवला आहे.

सर्वपक्षीय विचारांच्या माध्यमातून ही निवडणूक लढविण्यात आली असल्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याकडे जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे पॅनलप्रमुखांनी घोषित केले आहे.

Web Title: The flag of the all-party panel on the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.