राजगुरुनगरात फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:40+5:302021-09-07T04:15:40+5:30
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फ्लॅग ऑफ सेरेमनी ऑफ सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी.आय.एस.एफ. व हुतात्मा राजगुरू स्मारक समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील येरवडा जेल ते नवी दिल्लीतील राजघाट असा तब्बल एक हजार सातशे किलोमीटरचा सायकल प्रवास ४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सायकल रॅलीद्वारे पूर्ण केला जाणार आहे. ही सायकल रॅली येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथून शनिवारी (४ सप्टेंबर) सुरू करण्यात आली. त्याचा फ्लॅग ऑफ राजगुरुनगरात झाला.
पुणे ते दिल्ली असा एक हजार सातशे किलोमीटर प्रवास करताना रविवारी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक, राजगुरूवाडा येथे येऊन सी.आय.एस.एफ. यांच्या प्रमुखांनी व राजगुरूनगर मधील मान्यवरांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमानिमीत्त हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शानदार कार्यक्रम घेण्यात आला. सी.आय.एस.एफ.च्या जवानांनी विविध देशभक्तिपर गीते व कला सादर केल्या.
या वेळी सी.आय.एस.एफ.चे ए.डी.जी. अनिलकुमार, आय.जी. के. एन. त्रिपाठी, निती मित्तल, लज्जाराम, सुमन कुमार, सुनिल जाधव, बी. एस. गुजर, सतीश नाईकरे उपस्थित होते. राजगुरुंचे वंशज सत्यशील राजगुरु, हर्षवर्धन राजगुरु व प्रशांत राजगुरु यांच्या हस्ते राजगुरुनगरात होते. सीआयएसएफच्या वतीने आशुतोष सिंग व मिनु लांबा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सचिव सुशील मांजरे, विठ्ठल पाचारणे, संदीप वाळुंज, शैलेश रावळ, विश्वनाथ गोसावी, बाळासाहेब कहाणे, नितीन शहा, प्रवीण वायकर, अशोक कोरडे, अरविंद गायकवाड, सचिन भंडारी, वर्षा चासकर, प्रिया भंडारी, शोभा सांडभोर, पल्लवी खेडेकर, सचिन लांडगे, अरुण गुरव, अजय थिगळे, संतोष लाखे, योगेश गायकवाड, प्रल्हाद कुंभार, अरुण गुंडाळ उपस्थित होते.