नीरा-भीमा कारखान्यावर ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:49+5:302021-08-17T04:15:49+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७४ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास ...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७४ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे. राज्यातील साखर उद्योग सध्या काहीसा अडचणीत असला, तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास यावेळी लालासाहेब पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी केले. ध्वजारोहणप्रसंगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, भागवत गोरे, मोहन गुळवे, माणिकराव खाडे, के. एस. खाडे, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.
शहाजीनगर येथे नीरा-भीमा कारखान्यावरती लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राजवर्धन पाटील, विलासराव वाघमोडे आदी.
१६०८२०२१-बारामती-०२