राज्यपाल्यांच्या हस्ते पुणे विधानभवन येथे ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:54+5:302021-08-17T04:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ...

Flag hoisting at Pune Vidhan Bhavan by the Governor | राज्यपाल्यांच्या हस्ते पुणे विधानभवन येथे ध्वजारोहण

राज्यपाल्यांच्या हस्ते पुणे विधानभवन येथे ध्वजारोहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या वेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले.

जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण समारंभाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Flag hoisting at Pune Vidhan Bhavan by the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.