सासवड तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:49+5:302021-08-17T04:17:49+5:30
सासवड शहरातील प्रमुख आकर्षण असलेले पालखी तळावरील ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त ...
सासवड शहरातील प्रमुख आकर्षण असलेले पालखी तळावरील ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त मेजर ययाती पेठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सासवड नगरपरिषदचे सर्व नगरसेवक, प्रभारी मुख्याधिकारी सूर्यकांत पठाडे, शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष इस्माइल सय्यद उपस्थित होते. वाघिरे महाविद्यालयाच्या छात्रांनी ध्वजास मानवंदना दिली. पुरंदर तालुक्यात कोविडकाळात काम केलेल्या संस्था तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड. संदीप कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी प्रास्ताविक केले.
———————————————————————————————
१६सासवड झेंडा वंदन
सासवड येथील तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणवेळी संचलन करताना पोलीस.
160821\img-20210816-wa0009.jpg~160821\16pun_2_16082021_6.jpg
फोटो ओळी : शिराळा येथे संपन्न झालेल्या रानभाजी महोत्सवात रानभाज्याची पाहणी करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे व इतर मान्यवर.~१६सासवड झेंडा वंदन सासवड येथील तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहनावेळी संचलन करताना पोलिस