ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:56+5:302021-03-05T04:11:56+5:30

पुणे : भगवी पताका हे राष्ट्र, धर्म, परमार्थ आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे. भगवा ध्वज ही देवालयाची निशाणी आहे. देवालयावर ...

The flag is a symbol of asceticism and masculinity | ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक

ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक

Next

पुणे : भगवी पताका हे राष्ट्र, धर्म, परमार्थ आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे. भगवा ध्वज ही देवालयाची निशाणी आहे. देवालयावर द्विकेतू ध्वज फडकवला जातो, ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम यांनी लंकेवर आणि अयोध्येवर देखील ध्वज फडकावला होता. ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समितीच्या वतीने मंदिर तेथे ध्वज या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील मंदिरात प्रत्येकी एक याप्रमाणे पाच हजार ध्वज उभारले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात श्रीराम मंदिर, तुळशीबाग येथे ध्वजपूजनाने झाली. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, श्री रामजी संस्थान तुळशीबागचे रामदास तुळशीबागवाले, विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख मनोहर ओक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री संजय मुरदाळे, नागनाथ बोंगरगे, सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, ‘मंदिरे ही संकल्पना सामाजिक अंगाने बांधली गेली आहे. पूर्वी मंदिरात न्यायनिवाडा, भजन, गायन यात्रा हे सगळे व्हायचे. त्यामुळे समाजातील लोक त्यानिमित्ताने एकत्र येत असत. त्यामुळे मंदिरे ही केवळ पूजेसाठी नव्हती. मंदिरे ही एकात्मता आणि अस्मितेचे प्रतीक आहेत.’

बाबूजी नाटेकर म्हणाले, ‘मंदिर हा समाजाचा केंद्रबिंदू आणि श्रद्धास्थान आहे. देशात आनंद आणि निकोप व्यवस्था निर्माण होण्यासाठी या श्रद्धास्थानांची पुर्नस्थापना होणे गरजेचे आहे. समाज विस्कळीत करायचा असेल, तर भारतीयांची श्रद्धास्थाने मोडली पाहिजेत, हे परकीयांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी राजवाडे, महाल नाही तर, मंदिरांची तोडफोड केली. त्यामुळे मंदिरांची पुर्नस्थापना झाली तर भारताची अस्मिता पुन्हा निर्माण होईल. समाजप्रबोधन आणि जागृतीचे केंद्रस्थान मंदिर व्हायला हवे.’

Web Title: The flag is a symbol of asceticism and masculinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.