पेरणे आरोग्य केंद्रात यंदाही ध्वज फडकलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:45+5:302021-08-17T04:17:45+5:30
लोणीकंद : गेली चार वर्षे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत पेरणे (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य ...
लोणीकंद : गेली चार वर्षे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत पेरणे (ता. हवेली) येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर्षीही ध्वजवंदन होऊ शकले नाही. यावर्षी ध्वजवंदनासाठी गांधीगिरी पद्धतीने आग्रह धरणाऱ्या मनसेलाही पुढच्या वर्षी ध्वजवंदन करू, असे आश्वासन प्रशासनाकडून देत ध्वजारोहण केले नाही.
अनेक वर्षांपासून पेरणे गावातील आरोग्य केंद्रामध्ये ध्वजारोहण होत नाही. ‘लोकमत’ने त्याची दखल घेत ‘पेरणे गावातील आरोग्य केंद्राला ध्वजारोहणाचे वावडे’ अशी बातमी दिली होती. तरीही आरोग्य विभागाच्या प्रशासनास घाम फुटला नाही.
पेरणे (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून स्वतंत्र इमारत असून चार वैद्यकीय अधिकारी, नर्ससह सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांसह दोन रुग्णवाहिका कार्यरत आहे. आरोग्य केंद्रतील प्रशासन जागेच्या वाद कारण पुढे करत चार वर्षं ध्वजवंदनासह राष्ट्रीय सण साजरे करत नाहीत. ही बाब लक्षात घेत यावर्षी ध्वजारोहणाची परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के, हवेली तालुकाध्यक्ष आबा वाळके, वाघोली शहर प्रमुख हितेश बोराडे, डॉ. प्रणव भिलारे, सुहास गायकवाड, शुभम मुळे, परशुराम चौधरी, सादिक सय्यद, गणेश तापकीर, सोनू शिंदे, विजय कदम, बाळू वर्पे, अभिषेक मिश्रा आदी कार्यकर्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात झेंडा, बाबू , दोरी, हार, नारळ आदी सामग्रीसह दाखलही झाले. हे पाहून प्रशासनाचे धाबे दणानले निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निलिमा इनामदार यांच्याकडे सुपूर्द केले. डॉ. निलिमा इनामदार व डॉ. प्रियांका कोलते - सातव यांनी ही बाब वरिष्ठांच्या तसेच ग्रामपंचायत सोपवून हातवर केले. मनसे कार्यकर्ते झेंडावंदन करण्यासाठी ठाम होते. डॉ. इनामदार यांनी ही बाब
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालत जागेचा प्रश्न सोडूवन ध्वजवंदनासाठी शासकीय निकषानुसार जागा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.
पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, उपसरपंच चांगदेव कोळपे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, रवींद्र वाळके, साईनाथ वाळके, दत्ताआबा वाळके, माधुरी वाळके, वर्षा वाळके आदींसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही कार्यकर्त्याना समजावत याविषयी ठोस तोडगा काढण्याची ग्वाही दिली. सध्या ध्वजवंदनासाठी शासकीय निकषानुसार जागा उपलब्ध नसल्याने ध्वजवंदन करता आले नाही. मात्र येत्या २६ जानेवारीपर्यंत याची पूर्तता करुन ध्वजवंदन करण्याची ग्वाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निलिमा इनामदार तसेच सरपंच रुपेश ठोंबरे यांनीही दिले.
--
चौकट
जागेचा वाद प्रलंबित :
पेरणे (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लगतच्या शिल्लक जागेबाबत खासगी मालकीवरुन वाद आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्ताराच्या नवीन योजना तसेच ध्वजवंदनासह राष्ट्रीय सणही साजरे करता येत नाहीत. हा प्रश्न लवकरात लवकर साेडवून आरोग्य केंद्राचा विस्तार तसेच ध्वजवंदन सुरु करावे, अशी सर्वांचीच मागणी आहे.
--
१९ पेरणे ध्वजारोहण
फोटो ओळी - पेरणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.निलिमा इनामदार यांचा ध्वजारोहण न करण्याबद्दल मनसेच्या वतीने गणेश म्हस्के यांनी गांधीगिरी करत साहित्य सुपूर्त करत सत्कार केला.
160821\16pun_3_16082021_6.jpg~160821\16pun_4_16082021_6.jpg
१९लोणीकंद पेरणे ध्वजारोहणफोटो ओळी - पेरणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.निलीमा इनामदार यांचा ध्वजारोहन न करण्या बद्दल मनसेच्या वतीने गणेश म्हस्के यांनी गांधीगीरी करत साहीत्य सुपुर्त करत सत्कार केला ~१९ पेरणे ध्वजारोहणफोटो ओळी - पेरणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.निलीमा इनामदार यांचा ध्वजारोहन न करण्या बद्दल मनसेच्या वतीने गणेश म्हस्के यांनी गांधीगीरी करत साहीत्य सुपुर्त करत सत्कार केला