फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:16 AM2018-07-26T02:16:28+5:302018-07-26T02:18:04+5:30

पर्यटकांच्या गर्दीनं जलायश फुलला

Flamingos arrive in Pimpalgaon Joga area ...! | फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...!

फ्लेमिंगोंचे पिंपळगाव जोगा परिसरात आगमन...!

googlenewsNext

खोडद : पक्षी अभ्यासकांना, पर्यटकांना वेड लावणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन पिंपळगाव जोगा जलाशयावर झाले आहे. या पक्ष्यांच्या सहवासाने जलाशयाचा परिसर सौंदर्याने फुलून गेला आहे.
परिसरात फ्लेमिंगो जलाशयाच्या परिसरात ठिकठिकाणी थव्या थव्याने राहत आहेत. पर्यटक व पक्षी अभ्यासकांची पावलं या परिसरात वळू लागली आहेत. जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंसह इतर विविध प्रकारचे अनेक पक्षी गर्दी करत असतात. माणिकडोह, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा अशी ५ धरणे या तालुक्यात आहेत. या धरणांच्या पाणलोट परिसरात अनेक पक्षी मोठ्या संख्येने येतात. माळशेज घाटाजवळ असणाºया व किल्ले हरिश्चंद्र गडाकडे जाणाºया वाटेवरील पिंपळगाव जोगा या धरणामध्ये तब्बल ३० वर्षांपासून हे फ्लेमिंगो दरवर्षी नित्यनियमाने येत आहेत.
पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक यांनी सांगितले की, जगभरात या पक्ष्याच्या एकूण ६ प्रजाती आढळतात. लेसर फ्लेमिंगो आणि ग्रेटर फ्लेमिंगो या २ प्रजातींपैकीच भारतातील स्थानिक आहे. ज्या आपल्याकडे दरवर्षी आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये दिसतात. भातखाचरं, लहान-मोठी पाण्याची तळी, गोड्या पाण्याचा तलाव, जलाशय, खाड्या, मोठ्या धरणाचा पाणपसारा, मिठागरे, दलदली ही ठिकाणं या पक्ष्यांची अधिवासाची ठिकाणं आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो.
मढ येथील निसर्ग अभ्यासक यश मस्करे यांनी सांगितले की, जुन्नरजवळील पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात रोहित पक्षी चक्क भर पावसाळ्यात दिसतात. जूनच्या सुरुवातीला ते येथे येतात. सप्टेंबरपर्यंत ते येथेच दिसतात. फॉरेस्ट रेकॉर्डनुसार १९८१ ते १९८२ पासून त्यांची नोंद आहे.

> कच्छच्या रणातही आढळते या पक्ष्यांची वस्ती
उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे.भारतातपण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात. पाणी व ऊन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते. त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते.

Web Title: Flamingos arrive in Pimpalgaon Joga area ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.