बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:44 AM2017-08-05T03:44:31+5:302017-08-05T03:44:31+5:30

बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हिंजवडी येथील ४३३० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली.

 Flat illegal construction | बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

बेकायदा बांधकाम जमीनदोस्त

Next

बाणेर : बेकायदा, विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हिंजवडी येथील ४३३० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली. सकाळी साडे नऊच्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
हिंजवडी येथील गट नं. १५२/२/१ अ मधील शंकुमार ऊर्फ शामसुंदर अकलू साह यांना अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरू ठेवल्याने शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आणि अन्य कर्मचाºयांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान प्राधिकरण कार्यक्षेत्राअंतर्गत घर अथवा सदनिका खरेदी करण्यापूर्वी इच्छुक खरेदीदारांनी संबंधित बांधकामास पीएमआरडीएकडून रितसर बांधकाम परवानगी घेतली असल्याची खात्री करून, तसेच मंजूर बांधकामाचे आराखडे तपासूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच प्राधिकरणाच्या बांधकाम परवानगी विभागाशी संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांनी केले आहे.

Web Title:  Flat illegal construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.