वानवडीत रस्त्यांवरील ‘फ्लेक्स’ धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:15 AM2018-11-12T02:15:45+5:302018-11-12T02:15:50+5:30
महानगरपालिका व छावणी बोर्ड : हद्दीचा वाद, फ्लेक्स वेळेवर लावले जातात; परंतु काढले जात नाहीत.
वानवडी : परिसरात शुभेच्छा, कार्यक्रम, व्यावसायिक जाहिराती यांचे फ्लेक्स लावण्यात आले असून, ते आता धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे फ्लेक्स लावले जातात, पण ते काढणार कोण, हा प्रश्नच निर्माण झालेला आहे. कँटोन्मेंट हद्दीतील फातिमानगर चौकात वळणाच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला व्यावसायिक, राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्याकडून कार्यक्रम, शुभेच्छा व जाहिरातींचे फ्लेक्स
लावले आहेत. परंतु, हे फ्लेक्स तुटल्याने पडण्याच्या स्थितीमध्ये आहेत, त्यामुळे वाहकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा
धोका असून, ते फ्लेक्स अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता आहे.
वानवडी परिसरात रस्त्याच्या कडेला, रस्त्यावरील विद्युत दिव्यांच्या खांबांवर, महावितरणच्या विद्युत वाहक डीपींवर, तसेच रस्त्यावरील मोठ मोठ्या झाडांवर असुरक्षितरीत्या व्यावसायिकांचे, राजकीय नेत्यांचे तसेच शुभेच्छा देणाºया कार्यकर्त्यांचे फ्लेक्स कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना लागले असून, ते धोकादायक आहेत. जाहिरात करण्यासाठी होर्डिंग असूनसुद्धा परिसरात व सार्वजनिक ठिकाणी परवानगी नसतानादेखील लाकडाच्या, तसेच लोखंडी चौकटीवर छापलेले फ्लेक्स चिकटवून रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी जागा मिळेल तिथे लावले जातात. परंतु, ते वेळच्या वेळी काढले जात नसून ते त्या जागीच खराब होऊन पडून जातात.
नुकत्याच होर्डिंग पडलेल्या घटनेचा अनुभव असतानादेखील अशा प्रकारचे छोटे-मोठे फ्लेक्स पडूनसुद्धा मोठा अपघात होऊ शकतो. तरी देखील या समस्येकडे दर्लक्ष होते आहे.
वेळेत लावले जातात; पण काढणार कोण..?
४एखादा कार्यक्रम किंवा सण, शुभेच्छा देण्याच्या वेळी; तसेच व्यावसायिक जाहिरात करण्यासाठी फ्लेक्स मोठ्या आवडीने एका रात्रीत लावतात; परंतु तोच कार्यक्रम, सण झाल्यानंतर हे फ्लेक्स लावणाºयांकडून लगेच काढले जात नाहीत, त्यामुळे ते नक्की कोण काढणार, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कँटोन्मेंट व महापालिकेकडून याबाबतीत कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
४महापालिका प्रशासनाच्या आकाशचिन्ह किंवा अतिक्रमण विभागाकडून धोकादायक ठिकाणी लावण्यात येणाºया अनधिकृत विनापरवाना छोट्या-मोठ्या फ्लेक्स लावणाºयांवर कारवाई करून दंड वसूल केला पाहिजे, जेणेकरून महापालिकेचा महसूल वाढण्यास मदत होईल व फ्लेक्स लावणाºयांवर वचक बसेल.
परवानगी नसताना विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या व धोकादायक स्थितीत फ्लेक्स लावणाºयांवर कारवाई करण्यात येईल; तसेच अनधिकृत धोकादायक फ्लेक्स काढण्यात येतील.
- मुरलीधर लोणकर,
परवाना निरीक्षक,
आकाशचिन्ह विभाग