नगरसेविकेला फ्लेक्सबाजी महागात; गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:14 AM2018-11-02T03:14:19+5:302018-11-02T03:14:34+5:30

महापालिका भवनसमोर भाजपाच्या एका महिला नगरसेविकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावला. परंतु कार्यकर्त्यांची ही फ्लेक्सबाजी संबंधित नगरसेविकेला चांगलीच महागात पडली आहे.

Flexibility to corporates; High court orders to file a crime | नगरसेविकेला फ्लेक्सबाजी महागात; गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नगरसेविकेला फ्लेक्सबाजी महागात; गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Next

पुणे : महापालिका भवनसमोर भाजपाच्या एका महिला नगरसेविकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावला. परंतु कार्यकर्त्यांची ही फ्लेक्सबाजी संबंधित नगरसेविकेला चांगलीच महागात पडली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले, की सामाजिक कार्यकर्त्या कनिझ सुखरानी यांनी बेकायदा फ्लेक्सबाजी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीदरम्यान सुखरानी यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही शहरात राजकीय कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीररीत्या फ्लेक्स लावण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी नुकतेच महापालिकेसमोर भाजपा नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या अवाढव्य फ्लेक्ससह येरवडा परिसरातील दोन आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेला एक अशा चार फ्लेक्सचे फोटो न्यायालयात सादर केले. यावर न्यायालयाने फ्लेक्स लावणाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने याप्रकरणी नगरसेवक अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे. तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या दोन फ्लेक्सवर तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील फ्लेक्सवर ज्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र येरवडा आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून अनुक्रमे येरवडा आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

याचिकेवर निर्णय होण्याची शक्यता
कनिझ सुखरानी यांनी बेकायदा फ्लेक्सबाबत दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (दि.२) पुढील सुनावणी आहे. यासंदर्भात माहिती देताना विजय दहिभाते यांनी सांगितले, की तीन दिवसांपूर्वी न्यायालयाने सुनावणीदरम्यान, बेकायदा फ्लेक्स लावणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासोबतच यापूर्वी राजकीय पक्षांनी बेकायदा फ्लेक्सबाबत न्यायालयात सादर केलेली प्रतिज्ञापत्रही उपस्थित ठेवण्यास सांगितली आहेत.

Web Title: Flexibility to corporates; High court orders to file a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.