नाथपंथीय साधूंवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By Admin | Published: October 3, 2015 01:01 AM2015-10-03T01:01:49+5:302015-10-03T01:01:49+5:30

सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्यातील नाथपंथीय साधूंच्या झुंडीचे मंचर शहरात भक्तिभावाने शुक्रवारी स्वागत करण्यात आले. शहरातून भव्य शोभायात्रा काढून शोभायात्रेवर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Floral from helicopter on Natha Sadhus | नाथपंथीय साधूंवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नाथपंथीय साधूंवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

googlenewsNext

मंचर : सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्यातील नाथपंथीय साधूंच्या झुंडीचे मंचर शहरात भक्तिभावाने शुक्रवारी स्वागत करण्यात आले. शहरातून भव्य शोभायात्रा काढून शोभायात्रेवर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
श्री क्षेत्र वडगाव काशिंंबेग येथे गुरुवारी नाथपंथीय साधूंच्या झुंडीचा मुक्काम होता. सकाळी झुंडीने मंचरकडे प्रस्थान केले.
मंचर शहरातून नाथपंथीय साधूंची शाही मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी उंट व पाठोपाठ घोडे होते. घोड्यांवर मावळे स्वार झाले होते. चार छोट्या तोफांमधून मिरवणुकीवर फुले टाकण्यात आली. सुमारे सात टन फुलांच्या रस्त्यावर पायघड्या घालण्यात आल्या
होत्या. आळंदी येथील छोट्या
मुलांचे भजनी मंडळ, विविध रथ,
झांज पथके, नाशिक बाजा, भगवान शिवशंकराचा हलता देखावा या शाही मिरवणुकीत सहभागी झाला होता.
हेलिकॉप्टरने केलेली पृष्पवृष्टी
हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. तपनेश्वर मंदिराजवळ साधू महाराजांसह शाही मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील मंदिरावंर फुले टाकण्यात आली.
दत्तमंदिर येथे ह.भ.प. योगी बेलनाथमहाराज यांचे प्रवचन झाले. वडगाव ग्रामस्थांनी भजनी मंडळ, झांजपथक व पारंपरिक वाजंत्री यांच्यासमवेत मिरवणूक काढली.
मंचर येथे माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या निवासस्थानी लाला बँकेचे जनसंपर्क अधिकारी कैलास बाणखेले, प्रल्हाद बाणखेले, रामदास बाणखेले, युवराज बाणखेले यांनी स्वागत केले. मंचर शहरातील तपनेश्वर मंदिर येथे पात्र देवतेची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सरपंच दत्ता गांजाळे, उपसरपंच महेश थोरात, सहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, सुनील बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, स्वप्निल बेंडे, धनेश मोरडे व ग्रामस्थांनी स्वागत केले.
अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर, अध्यक्ष दिलीप महाजन, पंंडित माशेरे, गणपतराव क्षीरसागर, संजय कडधेकर, राजू
जुन्नरे, रामराजे निघोट, सोनू गुजर, गणेश बोऱ्हाडे, बजरंग दलाचे
सुहास बाणखेले, बाबू बोऱ्हाडे,
संतोष खामकर यांनी नियोजन
केले. नाथपंथीय साधूंची झुंड
मंचर येथे आज मुक्कामी
असून, सकाळी गोरक्षनाथ टेकडीकडे प्रस्थान करणार आहे.
(वार्ताहर)

Web Title: Floral from helicopter on Natha Sadhus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.