उजाड माळरानावर फुलवली डाळिंबबाग

By admin | Published: July 9, 2015 11:19 PM2015-07-09T23:19:07+5:302015-07-09T23:19:07+5:30

पारवडी (ता. शिरूर) येथील दत्तात्रय कोकरे यांनी उजाड माळरानावर डाळिंबाची बाग फुलविली आहे. ७५ वर्षीय कोकरे हे स्वत: शेतामध्ये आधुनिक ज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत.

Flourished pomegranate | उजाड माळरानावर फुलवली डाळिंबबाग

उजाड माळरानावर फुलवली डाळिंबबाग

Next

राहू : पारवडी (ता. शिरूर) येथील दत्तात्रय कोकरे यांनी उजाड माळरानावर डाळिंबाची बाग फुलविली आहे. ७५ वर्षीय कोकरे हे स्वत: शेतामध्ये आधुनिक ज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. पाच एकरांवर १४ बाय १० मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची १५००च्या जवळपास रोपे लावली होती.
आता डाळिंबाचा हा दुसरा बहार असून, ७५ टनांच्या जवळपास उत्पादन अपेक्षित आहे, तर ५० लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळेल, असे कोकरे यांनी सांगितले. आता डाळिंब तोडणीसाठी आली आहेत. अतिशय मुरमाड जमिनीत कधीही इतर कुठलेही पीक न येणारी पडीक जमीन असताना आधुनिक तंत्रज्ञान, ठिंबक सिंचन, जिवाणू खते, शेणखत, पालाशयुक्त खतांचा वापर, रासायनिक खतांचा नाममात्र वापर करून त्यांनी ही बाग उभी केली आहे. बऱ्याचदा आखाती व युरोपियन देशांमध्ये त्यांची
डाळिंब निर्यात झाली आहेत. या वर्षी त्यांचा डाळिंब निर्यातीचा मानस
आहे. सध्या दत्तात्रय कोकरे यांची
मुले कैलास व चंद्रकांत ०यांनी डोंगरउताराची जमीन दुरुस्त करून नवीन १० एकरांवर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे.

Web Title: Flourished pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.