‘अनलॉक'नंतरही गरजूंना मदतीचा ओघ चालू राहावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:53+5:302021-06-09T04:11:53+5:30
पुणे : “कोरोना महामारीच्या संकटामुळे गरजेच्या वस्तू सुखवस्तू वाटू लागल्या आहेत. एकीकडे राज्यात अनलॉक होत असले, तरी अनेकांच्या घरात ...
पुणे : “कोरोना महामारीच्या संकटामुळे गरजेच्या वस्तू सुखवस्तू वाटू लागल्या आहेत. एकीकडे राज्यात अनलॉक होत असले, तरी अनेकांच्या घरात खाण्यापिण्याचे संकट आहे. त्यामुळे समाजातील गरजूंना मदतीचा ओघ यापुढेही चालू राहावा,” अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) वकील आघाडी, ब्राह्मण आघाडी व चित्रपट आघाडीच्या वतीने दिव्यांग, उपेक्षित लोकांना तसेच तृतीयपंथीयांना अन्नधान्य संचाचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सोमवारी (दि. ७) मोदी गणपतीजवळ झालेल्या या कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिक्षण समितीच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, अभिनेते प्रवीण तरडे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, 'रिपाइं'चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनावणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, ‘संवाद’चे सुनील महाजन, ‘रिपाइं’ वकील आघाडीचे अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक ॲड. मंदार जोशी, चित्रा जानगुडे, ॲड. अर्चिता मंदार जोशी, चित्रपट आघाडीचे सुशील सर्वगोड, ब्राह्मण आघाडीचे अध्यक्ष प्रमोद दिवाकर आदी उपस्थित होते.
-------------------