गुळूंचे ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:19+5:302021-03-13T04:18:19+5:30

नीरा : काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुळुंचे येथील श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट व मंदिरावर विद्युत ...

Flower decoration in the ghat of Jyotirlinga | गुळूंचे ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

गुळूंचे ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट

Next

नीरा : काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या गुळुंचे येथील श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवभक्तांनी सोशल डिस्टंसिंग व कोरोनाचे नियम पाळत दर्शन घेतले. उद्या होणार भंडारा रद्द करण्यात आला आहे. कोणीही प्रसादासाठी येऊ नये, असे देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम असतात. यावर्षी कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे भाविकांनी सावधानता बाळगत दर्शन घेणे टाळले. परगावाहून कोणीही दर्शनासाठी आले नाही. स्थानिक भाविकांनी ही वेगवेगळ्या वेळेत दर्शन घेतले. महाद्वारावर सॅनिटायझर व मोफत मास्क ठेवले होते. भाविकांना मास्कचे लावण्याची व कोठेही हात लावू नये, अशी विनंती केली जात होती. भाविकांनी सकारात्मक भूमिका घेत देवस्थानच्या आव्हानाला प्रतिसाद दिला.

फोटो आहे

Web Title: Flower decoration in the ghat of Jyotirlinga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.