श्री महागणपती मंदिराला फुलांची सजावट, ५०१ मोतीचूर लाडूंचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:56+5:302021-08-26T04:12:56+5:30
देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच उद्योजक व गणेशभक्त संतोष ...
देवस्थानच्या वतीने श्रींच्या समोर दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच उद्योजक व गणेशभक्त संतोष गवारे व महागणपती सेवा मंडळ यांच्याकडून ५०१ मोतीचूर लाडूंचा महानैवेद्य श्री महागणपतीला दाखविण्यात आला. प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून, "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे व पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॅा. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे, तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो:रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपतीला ५०१ मोतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखविण्यात आला.
250821\img-20210825-wa0119.jpg
श्री महागणपतीला मोतीचुर लाडूंचा नैवेद्य दाखविण्यात आला