फ्लाॅवरचे बियाणे निघाले निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:15+5:302021-07-28T04:12:15+5:30
मंचर: फ्लाॅवरचे बियाणे व रोपे निकृष्ट व बनावट निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळगाव खडकी ...
मंचर: फ्लाॅवरचे बियाणे व रोपे निकृष्ट व बनावट निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळगाव खडकी येथील शेतकरी संतोष देवराम बांगर, नितीन तुकाराम अरगडे, घनश्याम हनुमंत राक्षे, सुभाष मनाजी पोखरकर या चारही शेतकऱ्यांनी चांडोली खुर्द येथील एका नर्सरीतून फ्लाॅवर रोपांची खरेदी केली. चारही शेतकऱ्यांनी याच जातीच्या बियाण्यांच्या रोपांची लागवड केली होती. निकृष्ट व बनावट बियाणे लागल्याने चारही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या फ्लावर या पिकाला चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु जवळपास ८० ते ९० टक्के फ्लाॅवरचे गड्डे खराब होऊन तांबूस पडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कृषी सहाय्यक महेश सैद यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.