सेंद्रिय खताच्या जोरावर फुलवली मिरचीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:03+5:302021-05-31T04:09:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील ...

Flowering pepper garden on the strength of organic manure | सेंद्रिय खताच्या जोरावर फुलवली मिरचीची बाग

सेंद्रिय खताच्या जोरावर फुलवली मिरचीची बाग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील एका शिक्षकाने सिद्ध करून दाखवले आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्याने पट्याने दिलेली शेती त्यांनी स्वत: कसत ती फायद्यात आणली आहे. त्यांनी मिरची आणि काकडीचे सेंद्रिय पद्धतीने यशस्वी उत्पादन घेत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील शिक्षक प्रा. विठ्ठलराव दौंडकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे आईवडील जमेल तसे शेती करतात. मात्र, वय झाल्यामुळे त्यांना जमत नाही. वाटा पध्दतीने शेती करायला दिली, परंतु गुंतवलेले भांडवल फिटले नाही. गेली दोन वर्षे कोरोना काळात शिकवणी थांबल्या. आॅनलाईन शिकवणी करून हातात असणारा वेळ चांगल्या कामात घालवण्यासाठी शिक्षकी पेशा भरपूर पगार, आरामदायी जीवन असतानाही शेतीतील भांडवल उत्पन्नातून सुटत नाही. मात्र विठ्ठल दौंडकर यांनी स्वत: शेती करायची आणि इतरांपुढे आदर्श ठेवायचा, असे ठरवून राजगुरुनगर शहरात आपले कुटुंबासह रानमळा येथे वास्तव्यास नेले. महाविद्यालयीन वेळेत शैक्षणिक कामकाज करुन पत्नी, दोन मुली आणि आईवडिलांच्या मदतीने एक एकरात कमी पाण्याचा वापर, तण उगवू नये म्हणून मल्चिंग पेपरवर मार्च महिन्यात नियोजन केले. प्रथम आंतरपीक म्हणून उन्हाळ्याचा मौसम पाहून काकडी पीक लावले. त्यानंतर मिरची रोपांची लागवड केली. अडीच महिन्यांत मिरची तोडणी सुरू होण्याअगोदर काकडी पिकाची तोडणी संपवली. या काकडी पिकातून ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. सध्या आठवड्यातून एकदा होणाऱ्या तोड्यातून ८०० किलोचे मिरची उत्पादन मिळत आहे. सध्या हाॅटेल, केंटरिंग बंद असले तरी आज मिरचीला किलोला २८ ते ३२ रुपयांचा चाकणच्या मार्केटला बाजारभाव मिळत आहे. सर्वसाधारण आतापर्यंत या पिकाला एक लाखांचे भांडवल गुंतवले असले तरी आंतरपिकातील काकडीत ५० हजार मिळाल्यामुळे भांडवली खर्च निम्म्यावर आला. मिरचीचे एकूण उत्पादन कमी न होता वाढत जाणार आहे. संपूर्ण पिकाचे १५ तोडे होणार असून असाच बाजारभाव न राहता पावसाळ्यात भाव वाढला, तर या पिकातून चार लाखांचे भांडवली खर्च जाता मिळणार असल्याचे प्रा. विठ्ठलराव दौंडकर यांनी सांगितले.

फोटो ओळ. रानमळा (ता. खेड) येथे शिक्षक विठ्ठलराव दौंडकर यांनी मिरचीचा मळा फुलवला असून भरघोस उत्पादन घेत आहे.

Web Title: Flowering pepper garden on the strength of organic manure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.