फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:48 AM2018-09-28T00:48:30+5:302018-09-28T00:48:40+5:30

दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

 Flowers prices fall, paternal loss, paternal loss | फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान

फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान

googlenewsNext

भुलेश्वर - दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
पुरंदर तालुक्यात दर वर्षीच झेंडू, राजा शेवंती, कापरी, बिजली, पेपर व्हाईट इत्यादी फुले दर वर्षीच फुलवली जातात. या फुलांचे उत्पादनही चांगले निघते. यामुळे शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळाले आहेत. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात तर प्रमुख पीक म्हणून राजा शेवंतीचे पीक घेण्यात येते. या फुलांची लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात केली जाते. या वेळी पुरंदर तालुक्यात सर्वाधिक तापमान असते. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.
या फुलांचे बेणे अहमदनगर येथून आणावे लागते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन माळशिरस, टेकवडी व पोंढे या गावांतून निघत आहे. पुरंदरच्या पश्चिम भागातच बिजली, कापरी व झेंडूचे उत्पादन घेतले जाते. दर वर्षीच दसरा व दीपावलीच्या तोंडावर फुलांना मागणी वाढते. सध्या राजा शेवंतीचे फड उमलू लागले असून, ही फुले मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत आहेत. सध्या पितृपंधरवडा असल्याने फुलांना मागणी फार कमी आहे. मालाला उठाव नाही. यामुळे दोन वर्षांपूर्वी राजा शेवंतीची फुले दोनशे रुपये प्रतिकिलो विकली गेली होती. मात्र, गुरुवारी फक्त २० रुपये किलो दराने विकली गेली. यामुळे ऐन दसरा-दिवाळीत बाजारभाव काय असतील, हा प्रश्न फूलउत्पादकांना पडला आहे. दर वर्षीपेक्षा यंदा फूलउत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या बाजारपेठेत पेपर व्हाईटसारखी पांढºया रंगाची फुले सध्या चालू आहेत. ही फुले ग्राहकांना पसंत पडतात. याचा परिणाम राजा शेवंतीच्या फुलांवर होतो. त्याचप्रमाणे पितृपंधरवडा असल्याने मालाला उठाव नाही. संपूर्ण शेत पांढरेशुभ्र झाले आहे. अशात जर पाऊस पडला, तर फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.
- सचिन बोरकर, फूलउत्पादक शेतकरी

नुकताच गौरी-गणपती उत्सव पार पडला. सध्या पितृपंधरवडा असल्याने फुलांच्या मालाला मागणी कमी आहे. यामुळे सध्या २० रुपयांनी फुले विकावी लागतात. अहोरात्र कष्ट करणाºया शेतकºयांचे पैसे वसूल होत नाहीत.
- मोहन कुंजीर, फुलांचे व्यापारी

गणेशोत्सवानंतर फुलांचे भाव एकदमच खाली आले. सध्या पितृपंधरवडा सुरु असल्याने भाव आणखी खाली आले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. आगामी नवरात्रोत्सवासह दिवाळीमध्ये फुलांना उठाव मिळण्याची आशा आहे.
 

Web Title:  Flowers prices fall, paternal loss, paternal loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.