हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी

By श्रीकिशन काळे | Published: January 14, 2024 04:32 PM2024-01-14T16:32:46+5:302024-01-14T16:33:13+5:30

पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील

Fluctuations in weather Cold in the morning and evening hot in the afternoon | हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी

हवामानात चढ-उतार; सकाळी व सायंकाळी हवेत गारठा, तर दुपारी गरमी

पुणे : राज्यामध्ये या आठवड्यात सर्वत्र आकाश निरभ्र राहणार असून, हवामान कोरडे असेल. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात पडू शकते.पण थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. सकाळी व सायंकाळी हवेत गारठा असेल, दुपारी उष्णता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 
 
हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान वाढले असून, ते २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात कायम आहे. परिणामी राज्यासह दक्षिण भारत व मध्य भारतापर्यंत हवामानात बदल होतील. सध्या अरबी समुद्र व हिंदी महासागरावर चक्राकार वारे वाहत असल्याने या आठवड्यात हवामानत बदल होऊ शकतात. एल-निनोचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. या पुढील उन्हाळी हंगामात अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे तापमान वाढल्यास अवकाळी व अवेळी पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानात वाढ होईल, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. १८ जानेवारीनंतर आकाश निरभ्र राहील. पुणे व परिसरात ४८ तासांत आकाश कोरडे राहील. सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान शिवाजीनगरला १५.४ अंंश सेल्सिअस नोंदले गेले. 

Web Title: Fluctuations in weather Cold in the morning and evening hot in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.