उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 26, 2017 06:09 AM2017-05-26T06:09:52+5:302017-05-26T06:09:52+5:30
सांगवी फाटा येथील वाढती वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन औंधकडून वाकडकडे जाण्यासाठी सरळ मार्ग तर सांगवी व औंध जिल्हा रुग्णालयाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : सांगवी फाटा येथील वाढती वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन औंधकडून वाकडकडे जाण्यासाठी सरळ मार्ग तर सांगवी व औंध जिल्हा रुग्णालयाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर सांगवीकडून वाकडला जाण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल बांधून महिना उलटला तरी अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.
या चौकातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल बांधला. त्याचे ‘महात्मा ज्योतिबा फुले’ उड्डाणपूल असे नामकरणही करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीस सुरू केला नसल्याने उलट या चौकातील वाहतूककोंडीत अधिक भरच पडत आहे. वाकड, बालेवाडी या भागात जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे.