पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:01 PM2020-06-08T13:01:34+5:302020-06-08T13:05:28+5:30

व्याधीग्रस्त नागरिकांची विशेष काळजी घेणे व त्यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचू न देणे हे आता महापालिकेच्या आरोग्य विभागासमोरे मोठे आव्हान

Focus on ‘high risk’ citizens to prevent corona infection in the pune city | पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित

पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित

Next
ठळक मुद्देलवकर निदान करून वेळीच उपचारातून गंभीर परिस्थिती टाळण्यास प्राधान्य  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वषार्पुढील रूग्ण ८० टक्केसर्वाधिक व्याधीग्रस्त व ज्येष्ठ वारजे कर्वेनगरमध्ये 

निलेश राऊत- 
पुणे : कोरोनाचा (कोविड-१९) चा सर्वाधिक संसर्ग हा अन्य व्याधींनी (आजारांनी) ग्रस्त असलेल्या नागरिकानांच होत असल्याने, महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता शहरातील कंटन्मेंट झोनबाहेरील भागात नव्याने शोध मोहिम सुरू करून 'हाय रिस्क' नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंबर कसली आहे.अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या या 'हाय रिस्क' नागरिकांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे व पुढील संभाव्य गंभीर परिस्थिती टाळणे यास सदर मोहिमेतून प्राधान्य दिले जाणार आहे. 
    पुणे महापालिका हद्दीत १६ मार्च पासून ४ जूनपर्यंत ४० लाख ४२ हजार ४५४ घरांमध्ये चार फेºयाव्दारे,  १ कोटी ३७ लाख ७८ हजार ९२१ नागरिकांचे आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केले आहे.यातून उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अंगदुखी, गुडघेदुखी, किडणी, लिव्हर, हृदयविकार याच्यांसह टी़बी़, एचआयव्ही, कॅन्सर अशा अन्य आजारांचे १ लाख २५ हजार ७८४ नागरिक आढळून आले आहेत. या सर्व व्याधीग्रस्तांवर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. पण आता या व्यतिरिक्त पुणे महापालिका हद्दीतील अन्य व्याधीग्रस्त नागरिक व ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. 
    याकरिता शहरातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य आदींची नियुक्ती करण्यात आली असून, या सर्वांना विशेष प्रशिक्षण देण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. या सेवकांमार्फत व्याधीग्रस्त व ज्येष्ठांच्या आरोग्य तपासणीचे काम पुढील दोन महिने नित्याने केले जाणार आहे. सदर कामासाठी  ६७़६० लाख रूपयांची तरतूदही करण्यात आली असून, प्रत्येक सेविकेस प्रती घरामागे अतिरिक्त दोन रुपए मानधन दिले जाणार आहे.  
    सद्यस्थितीला कंटन्मेंट झोनमध्ये हे काम सुरू असून, आता उर्वरित शहरातही या कामाला गती दिली जाणार आहे. यात व्याधीग्रस्तांना पूवीर्पासून सुरू असलेली औषधे वेळेवर देण्याबरोबरच बी कॉम्पलेक्स, विटॅमिनच्या गोळ्या देणे़ त्यांच्या शारिरिक तापमानाची नोंद ठेवणे, बी़पी़, शुगर तपासणे, आॅक्सिजन पातळी तपासणे आदी कामे केली जाणार आहेत. तर सदर व्याधीग्रस्तांना अन्य लक्षणे दिसल्यास त्यास ताबडतोब दवाखान्यात आणून तपासणी करून, लागलीच पुढील उपचार सुरू करण्यात येणार आहेत. तसेच या ह्यहाय रिस्कह्ण नागरिकांवर लक्ष केंद्रित केले जात असतानाच, ते इतरांच्या संपर्कात येणार नाही याकरिता संबंधित व त्यांच्या कुटुंबियांनाही खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात येत आहे.
---------------------- 
सव्वा लाखात बहुतांशी ५० वयापेक्षा जास्त 
    आरोग्य विभागाने ज्या सव्वा लाख अन्य व्याधीग्रस्त नागरिकांची नोंद सर्व्हेक्षणाव्दारे केली आहे, त्यामध्ये बहुतांशी नागरिक हे ५० वयोगटापुढीलच आहे. तर काही हृदयविकार, टी़बी़, एचआयव्ही, कॅन्सरचे रूग्ण हे पन्नाशीच्या आतील आहेत. या सर्व व्याधीग्रस्त नागरिकांची विशेष काळजी घेणे व त्यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचू न देणे हे आता महापालिकेच्या आरोग्य विभागासमोरे मोठे आव्हान आहे.
    कोरोनाच्या जाळ्यात अन्य व्याधीग्रस्त रूग्ण सर्वाधिक सापडत आले असले तरी, गरोदर महिलांनाही कोरोनाचा संसर्ग अधिकचा झाल्याचे आत्तापर्यंत आढळून आले आहे. यामुळेच शहरातील विविध प्रसुतीगृहात नोंदणी केलेल्या व सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या शहरातील २ हजार ६३७ गरोदर महिलांची नोंद आरोग्य विभागाने स्वतंत्र ठेऊन यातील हाय रिक्स गरोदर महिलांची नित्याने तपासणी आरोग्य सेवकांव्दारे केली जात आहे. 
--------------------
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वषार्पुढील रूग्ण ८० टक्के 
    पुणे शहरात ४ जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ३६१ जणांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रूग्ण हे अन्य व्याधीने ग्रस्त होते़ तसेच ज्यांचा मृत्यू झाला आहे . त्यामध्ये ८० टक्के रूग्ण हे ५० वयापुढीलच असून, यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे ६० ते ७० वयोगटातील ११३ रूग्ण, ७० ते ८० वयोगटातील ८० रूग्ण, ५० ते ६० वयोगटातील ७४ रूग्ण आहेत. 
    सदर आकडेवारीतून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये अन्य व्याधी असलेले तसेच कोरोनाला हरविण्यात अयशस्वी ठरलेले हे बहुतांशी ज्येष्ठ नागरिकच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी लॉकडाऊन शिथिल झाल्यावर दैनंदिन जीवनात ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिकांनी विशेष काळजी घेणे जरूरी असल्याचे अधोरेखित झाले आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ५० व्याधीग्रस्त व ज्येष्ठ व्यक्तींमागे एका स्वयंसेवकाची नियुक्ती करून प्रत्येकाची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी (शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, बी़पी़,शुगर, इ)करून, सतत त्यांच्या संपर्कात राहून विशेष खबरदारी घेण्याचे नियोजन केले आहे. 
-------------
सर्वाधिक व्याधीग्रस्त व ज्येष्ठ वारजे कर्वेनगरमध्ये 
    महापालिकेने १६ मार्चपासून घरोघरी जाऊन सुरू केलेल्या सर्वेक्षणात, सर्वाधिक व्याधीग्रस्त (अन्य आजार असलेल्या व्यक्ती) व ५० वयोगटापुढील नागरिक हे वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. ४ जूनपर्यंत झालेल्या सर्व्हेत या भागात ३३ हजार ३६२ जणांची नोंद झाली असून, त्यापाठापोठ हडपसर येथे २६ हजार ३६५ जणांची नोंद झाली आहे़ तर येरवडा येथे ११ हजार ७५७ जणांची नोंद घेण्यात आली आहे.
--------------
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी'हाय रिस्क'नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या सदस्य आदींची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. यांच्याव्दारे व्याधीग्रस्त नागरिकांना अन्य लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर त्यांचे निदान करून वेळीच उपचारातून संभाव्य गंभीर परिस्थिती टाळण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 
डॉ. रामचंद्र हंकारे; आरोग्य प्रमुख पुणे महापालिका. 

Web Title: Focus on ‘high risk’ citizens to prevent corona infection in the pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.