कुपोषणमुक्तीवर लक्ष केंद्रीत करा : देवकाते
By admin | Published: April 10, 2017 02:11 AM2017-04-10T02:11:45+5:302017-04-10T02:11:45+5:30
जिल्ह्यात कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून कुपोषणमुक्तीकडे अधिकाऱ्यांनी
पुणे : जिल्ह्यात कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून कुपोषणमुक्तीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिल्या़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार सोहळ्यात देवकाते
बोलत होते़
यावेळी एनएबीएच, कायाकल्प मानांकन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा गुणगौरव, तसेच मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम व शारदाग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़ याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण सभापती चौरे आदी उपस्थित होते
देवकाते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे काम राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रथम क्रमांकाचे असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे़ गेल्या काही महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूने जिल्ह्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ९ जण हे ग्रामीण भागातील आहेत. याबाबतही आरोग्य यंत्रणेने जनजागृती करावी, असे आवाहन देवकाते यांनी केले
वळसे पाटील म्हणाले, आरोग्य विभागाचे चांगले काम असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास वाढला आहे़ बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ग्रामीण भागातही विविध प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याबाबतही येत्या काही दिवसांमध्ये जनजागृती करावी़ जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अतोनात कष्ट घेतल्याचे दौलत देसाई यांनी सांगत जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. देशात एकमेव जिल्हा परिषद असल्याचे सांगितले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भगवान पवार यांनी
केले तर सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले़. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी येणारे रुग्ण हे गरीब असतात त्यामुळे त्यांना चांगली सेवा द्या़ तसेच दवाखान्यांमध्ये स्वच्छता व टापटीप ठेवा आणि लसींची कमतरता भासू देऊ नका़ सध्या स्वाइन फ्लूची साथ असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे
- प्रवीण माने, सभापती आरोग्य व बांधकाम समिती