प्रॅक्टिकलवर भर द्यावा
By admin | Published: March 21, 2017 05:13 AM2017-03-21T05:13:03+5:302017-03-21T05:13:03+5:30
थेरॉटिकलऐवजी प्रॅक्टिकलवर अधिक भर द्यायला हवा. प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच यशस्वी इंजिनियर होवू शकतो. यासाठी
पिंपरी : थेरॉटिकलऐवजी प्रॅक्टिकलवर अधिक भर द्यायला हवा. प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच यशस्वी इंजिनियर होवू शकतो. यासाठी जे निकष आहेत ते महाविद्यालयांकडून पाळले जावेत, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी शासनाकडून काटेकोर लक्ष दिले जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
पिंपरीतील एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने १७ ते २० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिपेक्स’ प्रदर्शनाचा समारोप सोमवारी झाला. या कार्यक्रमात तावडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शिक्षण पद्धतीतील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे बोलत होते.
ते म्हणाले की, प्रॅक्टिकलमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिकता येते. डिग्री कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये पाठविणे गरजेचे आहे. पदवीधारक हा केवळ थेरॉटिकल मास्टर नसून प्रॅक्टिकल मास्टर असणे आवश्यक आहे. अशा प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे टॅलेन्ट पहायला मिळते. याचा विद्यार्थ्यांनाही
त्याचा फायदा व्हावा, यासाठी
या टॅलेंटला मार्केटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पांमधून मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र संकल्पनेलादेखील चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छगन पटेल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, सृजन संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, अभाविपचे शहरमंत्री नकुल वाझे, निमंत्रक गजानन वाबळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या निवडणुकात चांगले नेतृत्व समोर येते. या निवडणुकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. त्याचा बाऊ करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विनोद तावडे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी व्यासपीठावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांचा माईक बंद पडला. त्यावर शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचूच दिले जात नाही, अशी टिपण्णी त्यांनी केली. (प्रतिनिधी)