आचारसंहितेचे पालन करा

By admin | Published: February 17, 2017 04:23 AM2017-02-17T04:23:11+5:302017-02-17T04:23:11+5:30

निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेची सर्व अधिकारी

Follow the Code of Conduct | आचारसंहितेचे पालन करा

आचारसंहितेचे पालन करा

Next

बारामती : निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेची सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव यांनी केल्या.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण झाले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दोन सत्रांत देण्यात आले. पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे कर्मचाऱ्यांना उखा राठोड, स्वप्निल पवार यांनी प्रशिक्षण दिले.
या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, भूमीअभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक
अभियंता ओव्हाळ, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील, नायब तहसीलदार संजय पांढरपट्टे, दयानंद कोळेकर, भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Follow the Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.