कोविडचे नियम पाळा, अन्यथा लवकरच तिसरी लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:51+5:302021-04-09T04:12:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु कोरोनाच्या साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ...

Follow Kovid's rules, otherwise soon the third wave | कोविडचे नियम पाळा, अन्यथा लवकरच तिसरी लाट

कोविडचे नियम पाळा, अन्यथा लवकरच तिसरी लाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु कोरोनाच्या साथीवर नियंत्रणासाठी सर्व नागरिकांकडून ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’चे पालन होणे आवश्यक आहे. त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी पुण्यात दिले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुरुवार (दि.8) जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या समवेत कार्यालयात बैठक घेतली. तज्ज्ञ डॉ. जुगल, डॉ. घनश्याम यांचा या पथकात समावेश होता. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून करोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली. आरोग्य यंत्रणेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील करोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

करोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. नागरिकांकडून कोविड ॲप्रोपिएट बिहेवियरचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मास्क हे करोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात. दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग व्हावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सांघिक भावनेतून करोना नियंत्रणासाठी काम करत आहे. असेच टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी करोना उपाययोजनांत कार्यान्वित झालेली रुग्णालये, विलगीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील व्यवस्था, ऑक्सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली. पथकाने जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

Web Title: Follow Kovid's rules, otherwise soon the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.