विधायकतेचे अनुकरण करा

By Admin | Published: September 9, 2016 01:10 AM2016-09-09T01:10:04+5:302016-09-09T01:10:04+5:30

पुण्याचा गणेशोत्सव १२५व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. मागील काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत आहे. परंतु काही गणेशोत्सव मंडळे उत्सवाला विधायकतेकडे नेत आहेत.

Follow the legislation | विधायकतेचे अनुकरण करा

विधायकतेचे अनुकरण करा

googlenewsNext

पुणे : पुण्याचा गणेशोत्सव १२५व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. मागील काही वर्षात गणेशोत्सवाचे स्वरुप बदलत आहे. परंतु काही गणेशोत्सव मंडळे उत्सवाला विधायकतेकडे नेत आहेत. वेगवेगळ्या भूमिकेतून ती मंडळे समाजाकडे पाहात आहेत. त्यांचे अनुकरण व्हावे. अशी मंडळे आणि कार्यकर्त्यांमुळे समाजमन, साहित्यिक, विचारवंत, प्रज्ञावंत आणि प्रशासनाचे संवादसत्र उभे राहात आहे, असे मत संतसाहित्याचे
अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पोलिसांची गणेशोत्सवांतर्गत धान्यतुला करण्यात आली. अप्पर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, निरीक्षक संभाजी शिर्के, डॉ. प्रताप परदेशी, आनंद सराफ, विवेक खटावकर, डॉ. मिलींद भोई, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाले, रोहन जाधव, प्रशांत जाधव, उमेश कांबळे, गणेश सांगळे, अमित देशपांडे, विक्रांत मोहिते आदी उपस्थित होते.
पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेचे नामदेव रेणुसे, मोटार परिवहन विभागाचे सहाय्यक फौजदार दामोदर मोहिते, बिनतारी संदेश विभागाचे उपनिरीक्षक आबासाहेब सुंबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार संगीत सावरतकर-शिंत्रे यांची धान्यतुला करण्यात आली. सन्मानपत्र, रोप, श्रीफळ आणि महावस्त्र देऊन
त्यांना गौरविण्यात आले.
एकलव्य, आपलं घरं, बचपन
वर्ल्ड फोरम या संस्थेतील विशेष मुलांना हे धान्य देण्यात आले.
रविंद्र महाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आनंद सराफ
यांनी मनोगत व्यक्त केले.
शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अमर लांडे यांनी आभार मानले. 

Web Title: Follow the legislation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.