निर्बंध पाळा अन्यथा कडक लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:22+5:302021-04-17T04:11:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: निर्बंध असूनही अनेक नागरिक त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे. नागरिकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: निर्बंध असूनही अनेक नागरिक त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे. नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत तर कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्याचबरोबर आमदारांना त्यांच्या आमदारनिधीतून मतदारसंघात एक कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुण्यात कोरोना उपाययोजना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदारांना त्यांच्या चार कोटी रुपयांच्या आमदारनिधीतून मतदारसंघात एक कोटी रुपये खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यात कोरोना उपाययोजनेसाठी ३५० कोटी खर्च करणार आहोत.
----
महाआघाडी सरकार स्थिरच
महाआघाडी सरकार सुरूवाती पासूनच स्थिर सरकार असून, कोणीही काळजी करण्याचे कारण नाही. जोपर्यत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे आहेत तोपर्यत किंचितसुद्धा या सरकारला काहीही होत नाही, असे पवार यांनी सांगितले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणुकीबाबत ते म्हणाले, निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यावर आम्ही काय घरी बसून प्रचार करायचा का?