नियमांचे काटेकोरपणे पालन करा

By admin | Published: June 10, 2017 02:20 AM2017-06-10T02:20:56+5:302017-06-10T02:20:56+5:30

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार नोंदणीकृत पदवीधरांना अधिसभेवर निवडणून देण्यासाठीच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोरपणे

Follow the rules carefully | नियमांचे काटेकोरपणे पालन करा

नियमांचे काटेकोरपणे पालन करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार नोंदणीकृत पदवीधरांना अधिसभेवर निवडणून देण्यासाठीच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शुक्रवारी केले.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार निवडणुकीद्वारे १० पदवीधरांची अधिसभेवर सदस्य
म्हणून निवड केली जाणार आहे. पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या पुणे, अहमदनगर, नाशिक व दादरा नगर हवेली येथील
नोंदणीकृत पदवीधर मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण ५७ महाविद्यालयांतील प्रतिनिधींची व विद्यापीठातील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव व प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागातील सभागृहामध्ये पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे, निवडणूक कक्षातील उपकुलसचिव विकास पाटील, सहायक कुलसचिव एम. व्ही. रासवे उपस्थित होते.
विकास पाटील यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय कुटे यांनी केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयतीाल प्रतिनिधी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Follow the rules carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.