इंदापूरात अवैध गुटखा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; १ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:05 PM2021-02-13T12:05:30+5:302021-02-13T12:06:11+5:30

दोन जणांवर गुन्हा दाखल

Food and Drug Administration action against illegal gutka seller in Indapur; 1 lakh 27 thousand gutkha seized | इंदापूरात अवैध गुटखा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; १ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त 

इंदापूरात अवैध गुटखा विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; १ लाख २७ हजारांचा गुटखा जप्त 

googlenewsNext

इंदापूर (बाभुळगाव): इंदापूर शहरातील राज सुपर मार्केट व राज हाॅटेल या दोन दुकानात अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकार्‍यांनी शुक्रवारी तपासणी केली.यामध्ये १ लाख २७ हजार ३८८ रूपये किमतीचा व शासनाने विक्रीस बंदी घातलेला गुटखा, पानमसाला, सुवासिक तंबाखू असा माल जप्त केला आहे. 

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी बाळकृृृष्ण अंकुश यांनी दोन जणांविरोधात इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पदमाकर नरहरी तांदुळकर (वय ४७),व अजिज नूरमहंमद मोमीन (वय ५३,दोघेही रा.कसबा, इंदापूर,जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शुक्रवारी(दि. १२) सायंकाळी कसबा येथील मेसर्स राज सुपर मार्केट या दुकानात तपासणी केली असता  सुगंधी व सुवासिक तंबाखु, पान मसाला असा एकुण १ लाख २० हजार ९३८ रूपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला.तर त्याचदिवशी राज हाॅटेलमध्ये ६ हजार ४५० रू.किमतीचा अवैध गुटखा आढळुन आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अन्न व सुरक्षा विभागाकडुन दोन जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

Web Title: Food and Drug Administration action against illegal gutka seller in Indapur; 1 lakh 27 thousand gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.