पशूपक्ष्यांचे हाल होऊ नयेत म्हणून अन्नधान्य व पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:20+5:302021-03-18T04:10:20+5:30
ते म्हणाले पक्ष्यांच्या जीवाला गारवा देण्यासाठी ग्रीन फाउंडेशनने उपलब्ध केलेल्या व्यासपीठाला सर्व नागरिकांची साथ हवी ...
ते म्हणाले पक्ष्यांच्या जीवाला गारवा देण्यासाठी ग्रीन फाउंडेशनने उपलब्ध केलेल्या व्यासपीठाला सर्व नागरिकांची साथ हवी आहे. पक्षांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली घरटी, पाणी भांडे, धान्य भांडी पक्षीप्रेमी नागरिकांना ग्रीन फाउंडेशनच्या वतीने मोफत यांना देण्यात येणार आहेत. तसेच डोंगर परिसरात झाडाझुडपात धान्यभांडी लावण्यात येणार आहेत. पाण्याच्या शोधात फिरणारे पक्षी, अंगणात परिसरात भटकणाऱ्या चिमण्या यांना उपक्रमातून वात्सल्याचा ओलावा द्यायचा आहे. त्यासाठी ग्रीन फाउंडेशनचे सहकार्य लाभणारच आहे. या शिवाय आणखीही संस्था, नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन निरागस पक्ष्यांसाठी हक्काचे घर, धान्य, पाणी देता येऊ शकते.
उन्हाळ्याने लाहीलाही होत असताना पाण्याच्या, अन्नाच्या शोधासाठी पक्ष्यांची होणारी परवड दोन-तीन महिने सुरूच राहणार आहे. दोन-तीन महिन्यांमध्ये रोज दररोज मूठभर धान्य व वाटीभर पाणी अंगणात ठेवले तर उन्हाळासुद्धा पक्ष्यांसाठी सुखकर ठरणार आहे. त्यासाठी धान्य पाणी ठेवणाऱ्या हातांनी पुढे होण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण आपल्या टेरेसवर किंवा अंगणात धान्य व पाणी उपलब्ध करू शकता. आपली ही काळजी घेऊन आपण पक्ष्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
डोंगर परिसरामध्ये पाणी नसल्यामुळे पशुपक्षी पाण्याच्या शोधात वाड्यावस्त्यांकडे सरकले आहेत. पशुपक्ष्यांचे हाल होऊ नये यासाठी ग्रीन फाउंडेशन डोंगर परिसरात पाण्याची व्यवस्था करणार आहे. आपणही आपल्या घरासमोर धान्य, पाणी उपलब्ध करा. डोंगर परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी जाताना दोन-तीन पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाव्यात. त्यामुळे डोंगर परिसरातील नवीन लागवड केलेल्या झाडांना पाणी मिळेल, असे आवाहन अमित जगताप यांनी केले आहे.
ग्रीन फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारी भांडी.