अन्न सुरक्षा विमा योजना ही काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:34+5:302021-04-25T04:11:34+5:30

महावीर जयंतीच्या निमित्ताने ‘प्रसादम फूड पॅकेट्स’ व शहरातील सर्व दिव्यांगांना धान्य व भाजीपाला वाटप करण्यात येत असून या योजनेचा ...

Food security insurance plans need care | अन्न सुरक्षा विमा योजना ही काळाजी गरज

अन्न सुरक्षा विमा योजना ही काळाजी गरज

Next

महावीर जयंतीच्या निमित्ताने ‘प्रसादम फूड पॅकेट्स’ व शहरातील सर्व दिव्यांगांना धान्य व भाजीपाला वाटप करण्यात येत असून या योजनेचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिकाई) चे संस्थापक अध्यक्ष रघुनाथजी येमूल यांनी आपले विचार व्यक्त केले.

यासाठी दिव्यांगांशी मोबाईलवर संपर्क साधण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना एक विशिष्ट ओळखपत्र व क्रमांक देण्यात येईल. त्यांनंतर या दिव्यांगाना स्विगी किंवा झोमॅटोच्या माध्यमातून ऑन लाईन पद्धतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अवनी संस्थेच्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, माॅडर्न काॅलेज आणि उद्योजक दानेश शाह व परिवार विशेष मेहनत घेत आहेत.

Web Title: Food security insurance plans need care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.