बुद्ध पौर्णिमेनिमित्त श्रामणेर शिबिरार्थींना भोजन
By admin | Published: May 11, 2017 04:48 AM2017-05-11T04:48:41+5:302017-05-11T04:48:41+5:30
भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील बौद्ध सहायक संघ व यशोधरा महिला मं
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील बौद्ध सहायक संघ व यशोधरा महिला मंडळ बुद्ध विहार या ठिकाणी १५ दिवसांचे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले होते. बुद्ध पौणिमेच्या औचित्याने पुण्यातील समाजप्रबोधन ग्रुपच्या वतीने श्रामणेर शिबिरात आलेल्या बालकांसाठी व बौद्ध भंते यांच्यासाठी बुधवारी (दि. १०) स्वखर्चाने भोजन देण्यात आले.
या शिबिरात शेकडो लहान मुले श्रामणेर होऊन बुद्धधम्माचा अभ्यास व परंपरा शिकण्यासाठी सहभागी होतात. शिबिरात मुलांना आपले अनमोल जीवन कसे आदर्श असावे, यावर मार्गदर्शन दिले जाते. समाजप्रबोधन ग्रुपने मागील काळातही विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. या ग्रुपने शासनाकडे पाठपुरावा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी ‘ड्राय डे’ घडवून आणला होता. याबरोबरच ग्रुपकडून अन्नदान, नेत्रदान शिबिर इत्यादी सामाजिक उपक्रमही राबवले जातात. विशेष म्हणजे, यासाठी कुणाकडूनही वर्गणी न घेता उपक्रम राबवतात.
या श्रामणेर शिबिरात बुद्धवंदनेनंतर धम्ममित्र बुवासाहेब अहिवळे यांनी समाजप्रबोधन ग्रुपबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीलेश चव्हाण, संजय रासकर, सुभाष ठोकळे यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी विशाल सोनवणे, पराग चव्हाण, प्रवीण कांबळे, अॅड. दीपक गायकवाड, अॅड. किशोर भोरे, आनंद जोगदंड, उमेश मसनखांब, प्रवीण दहिंजे, विनोद गायकवाड, सचिन सातपुडके, अनिल कोल्हे, अभिजित निकाळजे, सुशील पोहरे, संदीप घोगरे, अजय जाधव, सागर भोसले, सुरेन्द्र चव्हाण, शहाजी सोनवणे, दत्ता मोरे व जयंत नागले हे सभासद उपस्थित होते.