रॅम्बो सर्कस कलाकारांना रोटरी क्लबकडून अन्नधान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:10 AM2021-04-22T04:10:39+5:302021-04-22T04:10:39+5:30
पुणे : कोविडमुळे सर्कस बंद पडली, उत्पन्न थांबले आणि कलाकारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. रोटरी क्लब गांधी भवनच्या सदस्यांनी ...
पुणे : कोविडमुळे सर्कस बंद पडली, उत्पन्न थांबले आणि कलाकारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. रोटरी क्लब गांधी भवनच्या सदस्यांनी सत्तर हजार रुपये जमवून या कलाकारांना दोन महिने पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा देत मदत केली.
मार्केट यार्डमधील राजेंद्र बाठिया यांच्या मदतीने दोन महिन्यांचे रेशन, तेल, मसाला, डाळी, बिस्किटे, सॅनिटायझर इत्यादी साहित्य बुधवारी रॅम्बो सर्कस संचालक बिजू नायर आणि साथीदारांना देण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष शशांक सप्रे, सचिव डाॅ. मिनल धोत्रे, डाॅ. उज्ज्वला बर्वे आणि माजी अध्यक्ष दिलीप कुंभोजकर तसेच पूना मर्चंटस् चेंबरचे राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार उपस्थित होते. सर्व ठिकाणी सरकारी मदत वेळेवर मिळेल असे नाही; पण समाजातील रोटरी क्लबसारखे घटक ही उणीव भरून काढतात ही समाधानाची बाब आहे.