Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:49 PM2024-07-12T12:49:57+5:302024-07-12T12:50:18+5:30

पोलिसांच्या चौकशीत प्रत्येक रुग्णाच्या मागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याची कबुली बोगस डॉक्टरने दिली

For 5 years unauthorised clinic have been robbing citizens A case has been registered against the doctor in loni kalbhor | Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

Loni Kalbhor: ५ वर्षांपासून बोगस दवाखाना टाकून नागरिकांना लुटतोय; डॉक्टरवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती परिसरात पांडवदंड येथे गेल्या पाच वर्षांपासून जनसेवा क्लिनिक या नावाने व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवरलोणी काळभोर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश रंगनाथ तोरणे (वय-६३, सध्या रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. मूळ रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. रुपाली रघुनाथराव भंगाळे (वय-३८, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुपाली भंगाळे या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. डॉ. भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करीत होत्या. तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांचा डॉ. भंगाळे यांना फोन आला की, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर इसम नामे प्रकाश तोरणे याच्याजवळ वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहीत्य व औषध गोळ्या विनापरवाना बाळगून आहे. स्वत: डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी, विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रुपाली भंगाळे व समुदय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे हे लोणी काळभोर पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी गेले. प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत व औषध-गोळया विक्रीबाबत महाराष्ट्र कौंसिल ऑफ मेडीसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली.तेव्हा तोरणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचे कोणतीही शैक्षणीक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले. तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याचे तोरणे याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषध गोळ्या जप्त करून दवाखाना सील केला आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षापासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

Web Title: For 5 years unauthorised clinic have been robbing citizens A case has been registered against the doctor in loni kalbhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.