महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:41 PM2024-11-18T12:41:22+5:302024-11-18T12:41:22+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या रहिवाशाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता

For the development of Maharashtra If you stay together, you will stay safe Suvendu Adhikari | महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा

महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’; पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांचा नारा

पुणे : देश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘एक राहाल तर सेफ राहाल’ असे आवाहन पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकार यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राहणाऱ्या पश्चिम बंगालच्या रहिवाशाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदीप कमाखा हालदा, रंजन चौधरी, सुभागात दास आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

शुभेंदू अधिकार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही पुण्यभूमी आहे. या पुण्यात ३० ते ३५ हजार पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगालला जाण्यासाठी फास्ट ट्रेन आणि विमानांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. पुण्यातील पश्चिम बंगालच्या रहिवाशांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: For the development of Maharashtra If you stay together, you will stay safe Suvendu Adhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.