दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 02:55 PM2022-11-20T14:55:49+5:302022-11-20T15:49:33+5:30

विश्वभ्रमण दिंडी २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी - पुणे - दुबई - राम मंदिर - बरजुमान - अबुदाबी - शारजा - पुणे - आळंदी असा प्रवास करणार

For the first time sant tukaram and sant dnyaneshwar maharaj ideas in dubai | दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

दुबईच्या राम मंदिरात माऊली अन् तुकोबांचा गजर; प्रथमच परदेशात संतांच्या विचारांचा प्रचार

googlenewsNext

आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या पादुका दुबईतल्या राम मंदिराच्या भेटीला जाणार आहेत. कार्तिक एकादशीनिमित्त यंदा संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी - पुणे - दुबई - राम मंदिर - बरजुमान - अबुदाबी - शारजा - पुणे - आळंदी असा प्रवास करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे प्रचार करण्यासाठी प्रथमच परदेशात जाण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा प्रीती करांडे यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्त्वज्ञान सामावलेल्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहून जगाला अंधकाररूपी अज्ञानातून प्रकाशरूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराजांनी ‘जगद्गुरू’ या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी पाचवी वेदरूपी 'अभंग गाथा' लिहिली. संत बहिणाबाईंच्या उक्तीप्रमाणे 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे जगातील सकल संतांचे महामेरू श्री संत ज्ञानोबाराय, तुकोबारायांच्या विचारांचा प्रसार - प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धरतीवर श्री संत ज्ञानोबा, तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन केले आहे. दुबईतील राम मंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे. दुबईत कार्तिकी एकादशी व त्रयोदशीला (दि. २२) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये विठू नामाचा गजर, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

Web Title: For the first time sant tukaram and sant dnyaneshwar maharaj ideas in dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.