जबरदस्तीने लग्न; तरुणावर गुन्हा

By admin | Published: December 24, 2016 12:34 AM2016-12-24T00:34:12+5:302016-12-24T00:34:12+5:30

आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणी तरुणासह तीन साथीदारांविरोधात दिघी

Forcible marriage Crime against youth | जबरदस्तीने लग्न; तरुणावर गुन्हा

जबरदस्तीने लग्न; तरुणावर गुन्हा

Next

पिंपरी : आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणीशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणी तरुणासह तीन साथीदारांविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रतिक राजेंद्र शेलार (रा. वडगावरासाई, शिरुर, पुणे) याच्यासह तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपी प्रतिक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी आरोपी प्रतिक याने लग्नासाठी तुझ्या आई-वडिलांची सहमती घेऊ असे सांगत तरुणीला फोन करुन शिरुर येथील टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या गेटवर बोलावून घेतले. त्यानंतर प्रतिक आणि त्याचे मित्र तरुणीला आळंदीला घेऊन गेले. प्रतिक याने तिच्याकडे लग्नासाठी मागणी केली. तिने लग्नाला विरोध केल्यावर आरोपींनी धमकी दिली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Forcible marriage Crime against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.