पोलिस असल्याचे सांगून फॉरेनरचे ११०० डॉलर्स लुटले, पुण्यातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: September 23, 2023 06:07 PM2023-09-23T18:07:52+5:302023-09-23T18:08:17+5:30
पुणे : पुण्यात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाला पोलिस असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...
पुणे : पुण्यात कामानिमित्त आलेल्या एका नागरिकाला पोलिस असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यमन येथून आलेल्या एका ३८ वर्षीय व्यक्तीने पोलिसांना तक्रार दिली. हा प्रकार ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमनवरून आलेल्या व्यक्तीला अज्ञाताने शाॅपिंग करताना एम.जी.रोड येथे गाठले. पोलिस असल्याचे सांगून एका पोलिसांचे ओळखपत्र दाखवत बॅग तपासायची आहे असे सांगितले. बॅगेतील डॉलर मोजत असताना दोन हजार डॉलर्सपैकी ११०० डाॅलर म्हणजेच भारतीय चलनातील ९१ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २२) अज्ञात व्यक्तीवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक बनसुडे हे पुढील तपास करत आहेत.