तेरुंगण-मळेवाडी पिंपरी रस्त्याला वनविभागाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:11+5:302021-04-13T04:09:11+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण ते वनदेव हा रस्ता व्हावा अशी गेले कित्येक वर्षांपासून या भागातील आदिवासी जनतेची ...

Forest Department permission for Terungan-Malewadi Pimpri road | तेरुंगण-मळेवाडी पिंपरी रस्त्याला वनविभागाची परवानगी

तेरुंगण-मळेवाडी पिंपरी रस्त्याला वनविभागाची परवानगी

Next

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तेरुंगण ते वनदेव हा रस्ता व्हावा अशी गेले कित्येक वर्षांपासून या भागातील आदिवासी जनतेची मागणी होती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. हा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे हा रस्ता करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.

अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी यांच्या वनहक्क दाव्यानुसार तेरुंगण ते वनदेव या रस्त्यासाठी परवानगी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वनविभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सततचा पाठपुरावा केला व अवघ्या आठवडेभरातच जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक जयरामे गौडा यांनी काही अटी शर्तीं टाकून या रस्त्यास परवानगी दिली आहे. रस्त्याचा उपयोग पाटण खोऱ्याशी

भीमाशंकर खोरे जोडले जाणार असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा माल ने आण करण्यासाठी सोपे जाणार आहे. तसेच वनदेव व वनदेव या पर्यटनस्थळास चालना मिळणार आहे, अशी माहिती माजी समाजकल्याण सभापती व आदिवासी नेते सुभाष मोरमारे यांनी दिली.

Web Title: Forest Department permission for Terungan-Malewadi Pimpri road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.