पिंगोरी येथे शॉटसर्किट मुळे वनवा; शेतकऱ्याचे सपार जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:55+5:302020-12-31T04:11:55+5:30

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंगोरी येथील शेतकरी ओमकार ज्ञानदेव यादव यांच्या शेताच्या कडेला आसलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट ...

Forest due to short circuit at Pingori; The farmer's sap burned | पिंगोरी येथे शॉटसर्किट मुळे वनवा; शेतकऱ्याचे सपार जळाले

पिंगोरी येथे शॉटसर्किट मुळे वनवा; शेतकऱ्याचे सपार जळाले

Next

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंगोरी येथील शेतकरी ओमकार ज्ञानदेव यादव यांच्या शेताच्या कडेला आसलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट मुळे ठिणगी पडली. त्यानंतर माळावरील वाळलेल्या गवताने पेट घेतला. गवत पेटल्याने त्याची आग शेतातील साहित्य ठेवण्यासाठी बनवलेल्या सपारा पर्यंत गेली. यामध्ये सपाराने सुद्धा पेट घेतला. सपारामध्ये शेतीसाठी असणारे सर्व साहित्य जाळून गेले.

विहिरीच्या बांधकामासाठी आणलेले सिमेंट, पीव्हीसी पाईप, शेती मशागतीच्या औजारे व इतर साहित्य जाळून गेले. पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे व तलाठी संजय खोमणे यांनी या ठिकाणी भेट दिली, असून नुकसानीचा पंचनामा केला आहे. उद्या तो शासकीय मदतीसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तलाठी संजय खोमणे यांनी दिली आहे.

-

वीज वितरण कंपनीची सदोष यंत्रणा जबाबदार

वीज वितरणाने नव्यावे टाकलेल्या अनेक वीज वाहक लाईन या सदोष आहेत. दर वर्षी ट्रान्सफॉर्मर असलेल्या ठिकाणी ठिणगी पडून आग लागण्याच्या घटना घडत असतात.अनेक वेळा गावातील ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ही आग विजवली जाते. मात्र अनेक वेळा तिथे वेळेत मदत पोचू शकत नाही अशावेळी शेतकरी व वन विभागाचे मोठे नुकसान होते. या वर्षी अशा घटना घडू नयेत म्हणून वीज वितरणाला जाळ पट्ट्या लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र विज वितरणकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती पिंगोरी गावचे पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी दिली.

Web Title: Forest due to short circuit at Pingori; The farmer's sap burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.